Thursday, January 5, 2023

शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी नवी मुंबई तर्फे मकर संक्रांती उत्सव 2023 चे आयोजन



 उरण दि. 5 ( विठ्ठल ममताबादे ) इष्टलिंग अविष्कार दिवस आणि मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी नवी मुंबई तर्फे रविवार दि 15 जानेवारी 2023 रोजी शिव विष्णू मंदिर सभागृह, पहिला मजला, प्लॉट नं. 8/9, वाशी बस डेपोच्या पाठिमागे, सेक्टर 9/A वाशी, नवी मुंबई येथे सायंकाळी 5 वाजता इष्टलिंग दिवस आणि मकर संक्राती उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

हळदी कूंकू समारंभ व भेटवस्तू वाटप, लहान मुलांना फळांचा अभिषेक व भेट वस्तु वाटप, मराठी,कन्नड व हिंदी सदाबहार मधूर गीतांचा भव्य संगीतमय कार्यक्रम असे विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पाच वर्षे वयाच्या आतील मुलामुलींच्या पालकांनी संस्थेच्या सदस्यांकडे आपली नांवे नोंदवावीत.त्याचबरोबर कार्यक्रमानंतर सर्वांसाठी पारंपारिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा असे आवाहन शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेत असून या कार्यक्रमात, उत्सवात सहभागी होण्यासाठी तथा अधिक माहितीसाठी सुनिता लक्कीमार - 9920593414,
स्नेहा हळ्ळी - 9702066660 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Sunday, December 25, 2022

आमदार गणेश नाईक यांनी श्री पूर्णानंद भारती स्वामी यांची भेट घेतली

नवी मुंबई ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांनी नौसील नाका येथे मातंग चेतना परिषद नवी मुंबई आयोजित श्री पूर्णानंद भारती स्वामीजी भव्य संत यात्रा व दर्शन सोहळा मध्ये उपस्तीथी दर्शवली. याप्रसंगी आमदार नाईक यांनी श्री पूर्णानंद भारती स्वामीजी यांची भेट घेतली. या कार्यक्रमाच्यावेळी सर्व मातंग समाज बांधवांनी आमदार गणेश नाईक यांचे स्वागत केले. याप्रसंगी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई

पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील बंबावीपाडा येथे चहाच्या टपरीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्याकडून देशी दारूच्या २७ बाटल्या जप्त करण्यात आले आहे. बंबावीपाडा येथे एक इसम चहाच्या टपरीमध्ये विनापरवाना दारू विक्री करताना पनवेल शहर पोलिसांना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याच्या टपरीमधून देशी दारूच्या एकूण ९४५/- रू किंमतीच्या २७ बाटल्या जप्त केल्या आहेत.

को.ए.सो.इंदुबाई वाजेकर शाळेचा पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन संपन्न

कोकण एज्युकेशन सोसायटीच्य इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेचे पारितोषिक वितरण समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन दि. 23 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा समितीचे चेअरमन व्ही. सी. म्हात्रे यांनी भूषविले. तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आणि शाळा समितीच्या सदस्या श्रीमती अंजली उर्हेकर तसेच इंडियन आयडल मराठीचा विजेता सागर म्हात्रे होते. शाळा समितीचे सदस्य सुभाष देशपांडे, नंदकुमार वाजेकर, शाळेचे माजी सभापती ॲड. प्रमोद ठाकूर, रोटरी क्लबचे सदस्य, विद्या संकुलातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षातील दहावीतील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पालक यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेतील सांघिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. शाळेचे हस्तलिखित 'ब्लॉसम' चे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा पाटील यांनी केले.तर शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानसी कोकीळ यांनी केले. ॲड. प्रमोद ठाकूर यांनी आपल्या भाषणात शाळेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आलेख मांडला. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उर्हेकर यांनी शाळेच्या प्रगतीमध्ये शाळेचे चेअरमन यांचा मोलाचा वाटा आहे असे सांगितले. आपल्या भाषणात शाळा समितीचे चेअरमन व्ही. सी.म्हात्रे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपली तत्वे, मूल्ये यांची कास धरून चालावे असे सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 'सागर म्हात्रे' यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सायंकाळी शाळेच्या प्रांगणात नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साजरे झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी या विषयावर नाटिका, छत्रपती शिवाजी महाराज, अवयव दान, मोबाईलचे इफेक्ट ,कोरोना योद्धांना मानवंदना, महाराष्ट्राची लोकधारा, विविधतेत एकता, भारतातील विविध सण समारंभ अशा वैविध्यपूर्ण विषयांवर नृत्य सादर केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे मत पाहुण्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Sunday, April 12, 2020

भाजप आरपीआय युतीच्या ५४नगरसेवकांनी आपले महापालिकेचे दोनमहिन्याचे मानधन महापौरसहाय्यता निधीत केले जमा


आमदार गणेश नाईक यांची महापौर आणि पालिका आयुक्तांना सूचना


आमदार गणेश नाईक यांची महापौर आणि पालिका आयुक्तांना सूचना


खारघर घरकुल सोसायटी मध्ये अडळले तीन रूग्ण


पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने जपली सामाजिक बांधिलकी !


तब्बल ६०० टन धान्याचे गरजूंना वितरण ! लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा मदतीचा हात


घराबाहेर पडाल तर होईल कारवाई ! गर्दीच्या ठिकाणी पोलिस परेड करून घराबाहेर न पडण्याचे आवाहन.


शिवसेना तर्फे गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्ग वासीयांना करण्यात आले जीवनावश्यक वस्तुचे वाटप


सरकारच्या मदतीची वाट न बघता सामाजिक संस्था व समाजसेवक करत आहेत मदत